Friday 6 July 2018

ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा

देवरी,दि.06 : ओबीसी समाजाला वैद्यकीय क्षेत्रात २७ टक्के आरक्षणावर गदा आणून फक्त २ टक्के आरक्षण देण्यात आले. या समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शासनाने बंद करुन अन्याय केला. केंद्र व राज्य शासनाने ओबीसी समाजावर होणारा अन्याय दूर करावा, या मागणीला घेवून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पंतप्रधानांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन त्यांचे प्रतिनिधी राजू लांजेवार यांनी स्वीकारले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या २७ टक्के आरक्षणावर वैद्यकीय क्षेत्रात गदा आणून फक्त २ टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शासनाने बंद करुन ओबीसी समाजावर अन्याय केला. तसेच मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा. समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे. जातिनिहाय जनगणना जाहीर करुन त्यांना निती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपयांचे भांडवल द्यावे. व्यवसायासाठी १० लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवावी, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळात ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अंतरिक्ष बहेकार, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, नगरसेवक नेमीचंद आंबिलकर, नरगसेविका माया निर्वाण, महिला तालुका अध्यक्ष पार्वता चांदेवार, वरिष्ठ कार्यकर्ते छोटेलाल बिसेन, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष युगेश बिसेन, तालुका सचिव बंटी भाटीया, नितेश वालोदे, सुमित मोहबिया आदींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...