गडचिरोली,दि.७ःजपान एशीयन असोसिएशन अँन्ड आशियन फ्रेन्डशीप सोसायटीच्या प्रतिनिधींनी धानोरा तालुक्यातील महावाडा, पदाटोला, मुस्का मुलचेरा तालुक्यातील लखमापुर बोरी गावाला भेट देऊन गावातील नागरिकांची संस्कृती व समस्या जाणून घेतल्या.
जपान येथील सुमिको तानाका, काझुको ओहामोटा, ताकाकी वातानाबे, अकीहिरो ताकाडा व कोहीयो योकायामा या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांनी २७ जून ते २ जूलै या कालावधीत अभ्यासदौरा केला. या दरम्यान रुदया संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. मुस्का येथील रुग्णालयाची पाहणी केली, २९ जून रोजी महावाडा गावाला भेट दिली. येथील नागरिकांनी पारंपारिक ढोलताशांच्या गजरात प्रतिनिधींचे स्वागत केले. संचालक काशिनाथ देवगडे, देवानंद सोनटक्के यांनी सुध्दा आपले विचार मांडले.
त्यानंतर कुकुटपालन व्यवसायाची माहिती जाणली. ३0 जून रोजी लखमापूर बोरी , १ जूलै रोजी मराठी उच्च प्राथमिक शाळा पदाटोला येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. दिलीप बारसागडे , रोजा बारसागडे, जया देवगडे, पिपरे उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात स्नेहल पिपरे, वर्षा कोसमशीले, प्रियंका दरेकर, पल्लवी मारगोणवार, प्रणाती पेशने, शुभम कोमरेवार, वैभव कोडापे यांनी माहिती दिली. या अभ्यासदौर्यातून बर्याच नवीन गोष्टी शिकता आल्या, अशी प्रतिक्रिया जपानच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment