गोंदिया,,दि.23ः- – कामगार विभाग व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यात 23 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
सडक अर्जुनी तालुका 23 जुलै धम्मसाधना केंद्र विहार सौंदड, 24 जुलै खोडसशिवनी, 25 जुलै कोसमतोंडी, 26 जुलै दुर्गा मंदिर सभागृह डव्वा, 27 जुलै पांढरी, 30 जुलै डोंगरगाव, 31 जुलै रेंगेपार दल्ली 1 ऑगस्ट ग्राम पंचायत भवन डूग्गीपार, 2 ऑगस्ट ग्राम पंचायत हॉल चिखली व 3 ऑगस्ट गुरुदेव सेवा आश्रम हॉल कोकणा अर्जुनी मोरगाव तालुका 23 जुलै कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगावबांध, 24 जुलै ग्राम पंचायत पिंपळगाव, 25 जुलै ग्राम पंचायत बाराभाटी, 26 जुलै ग्राम पंचायत अरुण नगर, 27 जुलै ग्राम पंचायत केशोरी, 30 जुलै ग्राम पंचायत गोठणगाव, 1 ऑगस्ट ग्राम पंचायत धाबेपौनी, 2 ऑगस्ट ग्राम पंचायत महागाव व 3 ऑगस्ट ग्राम पंचायत इटखेडा या ठिकाणी विशेष नोंदणी अभियान आयोजित केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी फी 25 रुपये एवढी आहे वर्गणी दरमहा 1 रूपया फक्त पाच वर्षाकरीता केवळ 60 रुपये वर्गणी आहे. नोंदणी करिता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. गेल्या वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकची सत्यप्रत व पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत. या अभियानात जास्तीत जास्त नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment