गोंदिया,दि.२५-जिल्हा परिषदेत मे महिन्यात प्रशासकीय बदली होऊनही विविध विभागांमधील वरिष्ठांची मर्जी असलेले कर्मचारी ठाण मांडून आहेत.जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीतून बदली झालेल्या कर्मचाèयांना त्वरीत बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश दिले.मात्र मुख्यालयातील कर्मचाèयांना मोकळीक का अशा प्रश्न विचारला जात आहे.पंचायत समितीतील कर्मचाèयांसाठी वेगळा नियम व जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाèयांसाठी शासनाने वेगळा नियम तयार केला काय अशी विचारणा होऊ लागली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपण प्रशासनात तज्ञ असल्याचे सांगत प्रत्येक गोष्टीत नियम सांगत असताना मुख्यालयातील कर्मचाèयांना सोडण्यात ते मागे पडले अशाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अजूनही प्रशासकीय बदली झालेल्या कर्मचाèयांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठविले जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या कर्मचाèयांची बदली करण्याचा नियम आहे. यात काही कर्मचारी तर १० वर्षांपासून मुख्यालयात आहेत. त्यांच्या बदलीबाबत कुठलीही फाईल फिरत नसल्याने त्यांचे प्रशासनातील वरिष्ठांशी साटेलोटे असल्याचे चर्चिले जात आहे.काही तर आपली बदली थांबविण्यासाठी मुख्यालयातच चकरा मारत बसले आहेत.वित्तविभागाशी संबधित तर बांधकाम व लेखा विभाग मिळावा यासाठी हेलपाटे मारतांना दिसून येत आहेत.
No comments:
Post a Comment