देवरी,दि.२३ः- येथील नगरपंचायतीच्या विविध विकास कामासाठी देवरी-आमगाव मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देवरी नगर पंचायतीकरिता पाच कोटी विकास निधीची मागणी केली होती. यात त्यांना यश आले असून नगर पंचायतीला पाच कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून त्याचे पत्र २१ जुलै रोजी नगर पंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आ. पुराम यांनी नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, उपाध्यक्ष आफताब शेख, मुख्याधिकारी चिखलखुंदे यांना दिले.
यावेळी आ. पुराम यांनी सांगितले की, देवरी शहराच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांकडून पाच कोटी मंजूर करवून घेतले असून मुख्यमंत्री निधीतून देखील नगर विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील नगर विकासासाठी आ. पुराम यांनी नऊ कोटी रुपये प्राप्त करून दिले असून या निधीतून नियोजनपूर्ण विकास कामे सुरू असल्याचे मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी सांगितले.
यावेळी नगर पंचायतीला मिळालेल्या अग्निशमन वाहनाची पापंचायतीला मिळालेल्या अग्निशमन वाहनाची पाहणी आ. पुराम यांनी केली. त्यांच्यासोबत नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रविण दहीकर, रितेश अग्रवाल, नेमीचंद आंबीलकर, नगरसेवक भूमिका बागडे, कोकीला दखने, माया निर्वाण, भेलावे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment