भंडारा,दि.18ः- बीपीएल कार्ड बनवून देण्याकरिता पुरवठा विभागातील अधिकार्यांना पैसे देण्याकरिता २ हजार रुपयांची लाच मागणार्या स्वस्त धान्य दुकानदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली.
राजेश मनिराम आगलावे (४६) रा. गंगानगर खात रोड भंडारा असे अटक करण्यात आलेल्या राज्य सरकारी अधिकृत स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे.
एपीएल केशरी कार्ड क्र. १४८१११ चे तक्रारदार जुन महिन्याचे राशन उचलण्याकरिता पटेलपुरा वार्ड बडा बाजार भंडारा येथे गेले असता दुकानदाराने राशन न देता कार्डबंद झाले असून राशन पाहिजे असल्यास बीपीएल कार्डबनवून देतो. त्याकरिता पुरवठा विभागातील अधिकारी ओळखीचे असून त्यांना २ हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा राशन बंद करण्याची धमकी दिल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २६ जून रोजी दिली. दरम्यान, विभागातर्फे सापळा रचण्यात आला असता आरोपी दुकानदार लाचेची रक्कम स्विकारताना दुकानदार आढळून आल्याने अटक करण्यात आली. आरोपीविरुद्धभंडारा पोलिसांनी कलम ८ ला.प्र.का.१९८८ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी करीत आहेत.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक प्रतावराव भोसले, सहाय्यक फौजदार गणेश पडवार, पोलीस नायक गोतम राऊत, रविंद्र गभने, सचिन हलमारे, पोलीस शिपाई शेखर देशकर, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मिक यांनी केली.
No comments:
Post a Comment