Thursday, 19 July 2018

वाहूून गेलेल्या टॅंकर चालकाचा मृतदेह आढळला

गोंदिया,,दि.19ः- तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत पावसाने हजेरी लावल्याने पांगोली नदीसह छोट्या मोठय़ा नाल्यांना पूर आलेला होता.याच दरम्यान रावणवाडी-कामठा-पांजरा मार्गावर असलेल्या पांगोली नदीवरील पुलावर सुध्दा या पुरामुळे पाणी चढले होते. या पाण्यातून जाणारा दुधाचा टँकर पलटून चालकासह टॅंकर वाहून गेल्याची घटना मंगळवार १७ जुलै रोजी रात्री ९ वाजता घडली. दरम्यान 18 जुर्लेपासून प्रशासनाने तपास कार्य सुरु केल्यानंतर आज बनाथर(वडेगाव) येथे टॅंकर चालकाचा मृतदेह आढळून आला.मृत वाहनचालकाचे नाव गौतम संतोष पाटील(माणिकवाडा,ता.नरखेड)जि.नागपूर असे आहे.तर तपास पथकाला घटना स्थळापासून दोन किलोमिटर अंतरावर बुधवारी टॅंकर सापडले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांच्यासह त्यांच्या चमूतील सर्व अधिकारी,कर्मचारी,नाविक यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला.उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या नेतृत्वात रावणवाडीचे पोलीस निरिक्षक सांडभोर,उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,तहसिलदार रविंद्र चव्हाण,के.डी.मेश्राम आदीं या तपास अभियानावर लक्ष ठेवून होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...