वर्धा,दि.06ः-भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात विविध प्रकरणी आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करून तपास करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय महिला कांग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्ता व युवक कांग्रेसच्या वतीने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.
शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार मदने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह च्या विरुद्ध जस्टिस लोया हत्याकांड, नोटबंदी महाघोटाळा, फर्जी एन्काऊंटर व विनयभंग सारखे आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करून तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याकरीता हे आंदोलन असून वर्धा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केल्या गेलेली आहे.
यावेळी एनएसयूआयचे प्रतीक भोगे, शुभम शेळके, वैभव तेलरांधे, विपिन राऊत, नीनाद जगताप, महेश तेलरांधे, वर्धा जिल्हा कॉँग्रेस कमेटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यासह विराज शिंदे, धनंजय दंधारे, अनिकेत कोटमकार,मयूर उइके,अनिकेत एकलारे,विपुल शेडमाके,अक्षय हातमोडे, गोविंद दिघिकर हे सर्व उपस्थित होते.
No comments:
Post a Comment