औरंगाबाद,दि.25 - मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाल्याने कन्नड मतदारसंघातील शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारला इशारा दिला होता. बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश न निघाल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ अशी, असे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ.जाधव समर्थकांसह दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनास बसले होते. आमदार पदाचा राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. काकासाहेब शिंदे यांच्या कुटूंबियांना वैयक्तिक पाच लाखांची मदत केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा पाठविला आहे. तसेच स्वत: भेट घेऊन देखील त्यांच्याकडे राजीनाम्याची प्रत देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment