Wednesday 18 July 2018

अामदार यशाेमती ठाकूर यांच्या कारला अपघात, शिवशाही बसने दिली धडक

अमरावती,दि.17-तिवसा मतदारसंघाच्या अामदार यशाेमती ठाकूर यांच्या कारला अपघात झाला. अामदार ठाकूर या नागपूरला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला जात असताना त्यांच्या कारला शिवशाही बसने जाेरदार धडक दिली. त्या सुरक्षित असून परत अमरावतीला अाल्याची माहिती मिळाली अाहे.
ही घटना तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावती -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी साडे 10 वाजता वरखेड फाट्यानजीक घडली. याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाहीच्या बसचालकावर तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.मिळालेली माहिती अशी की, आमदार यशोमती ठाकूर या कारने (एमएच 09 एटी 4009) पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे जात होत्या. दरम्यान परिवहन महामंडळाच्या शिवशाही (एमएच-29 बीई 0805) या बसने आ.ठाकूर यांच्या वाहनाला कट मारल्याने त्या थोडक्यात बचावल्या. यावेळी यशोमती ठाकूर यांनी शिवशाही बसचालकांला चांगलेच धारेवर धरले. शिवशाही बसने अतिशय जीवघेणा कट मारला. त्यामध्ये 18 प्रवासी, तसेच कारमध्ये आ.यशोमती ठाकूर, राजीव ठाकूर, स्वप्निल देशमुख व वाहनचालक सागर खांडेकर प्रवास करीत होते. ते थोडक्यात बचावले.या अपघातात त्यांची कार रस्त्यावरून 10 फूट खाली उतरली होती. ही चूक शिवशाही बसचालक सय्यद शादाब अली याने केली, असे प्रवाशांनीही मान्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...