नागपूर,दि.02ः- महिनाभरापासून दिवसाआड धावणारी नागपूर –
इटारसी – नागपूर पॅसेंजर सोमवारपासून नियमितपणे दररोज धावणार आहे. व्यवसाय,
शिक्षण किंवा अन्य कामानिमित्त या मार्गावर नियमित येण-जाणे असणार्या
प्रवाशांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
उत्तर मध्य रेल्वेअंतर्गत देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत धावणारी नागपूर -इटारसी- नागपूर पॅसेंजर १ जूनपासून दिवसाआड चालविण्यात येत होती. यामुळे या गाडीवर निर्भर प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली होती.
ट्रेन नियमितपणे केव्हा धावणार यासंबधी वारंवार उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात चौकशी केली जात होती. मात्र, देखभाल दुरूस्तीची कामे पूर्णत्वास आल्याने सोमवारपासून ही गाडी नेहमीच्या वेळेनुसार दररोज धावणार आहे. ट्रेन क्रमांक ५१८२९ नागपूर – इटारसी पॅसेंजर दररोज सकाळी ८ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावरून रवाना होईल. याचप्रमाणे ५१८३0 इटारसी – नागपूर पॅसेंजर दररोज दुपारी १२ वाजता इटारसी स्थानकावरून रवाना होईल. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

No comments:
Post a Comment