Tuesday, 24 July 2018

मध्यप्रदेशातील माफियांकडून खुलेआम वाळूचोरी

गोंदिया, दि.२४:: जिल्ह्यातील वाळूघाटावरून माफियांनी वाळूची चोरी करू नये म्हणून डड्ढोनच्या साहाय्याने नियंत्रण ठेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. परंतु, केवळ प्रात्यक्षिकानंतर एकदाच डड्ढोन वापरण्यात आले. त्यानंतर हा डड्ढोनच प्रशासनाने कोमात पाठविला. यामुळे माफियांनी परत वाळू चोरीला सुरुवात केली आहे.मध्यप्रदेशातील काही वाळूमाफियांनी गोंदियातील वाळूव्यवसायीकांशी हातमिळवणी करीत हा धंदा जोरात चालविला आहे.विशेष म्हणजे याप्रकरणात जिल्हाप्रशासनाचेही काही हात काळेबोरे दिसून येत आहेत.विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार पाच वर्षात जे खनिकर्म अधिकारी म्हणून कार्यरत राहिले त्या सर्वांची आर्थिक तपासणी पारदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर केली तर हा विभाग कसा सुखी आहे हे चित्र स्पष्ट होत या विभागातील गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्यास मदत होईल.
आगामी काळात गोंदिया जिल्ह्यात डड्ढोन हे हवाई तंत्रज्ञान प्रात्यक्षिकापुरतेच मर्यादित राहणार काय, असा सवाल महसूल प्रशासनातील काही अधिकाèयांकडून विचारला जात आहे. जिल्ह्यातून वाहणाèया वैनगंगा, वाघ, चुलबंद आणि शशीकरण या नदीपात्रात २३ वाळूघाट आहेत. यातील नक्षलबहुल भागातील वाघ नदीच्या पात्रात जवळपास अर्धा डझन वाळूघाट आहेत.दरवर्षी, जिल्ह्यातील माफियांसह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील माफिया येथील वाळू चोरट्या मार्गाने नेत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाला प्राप्त झाल्या आहेत. यामुळेच डड्ढोनच्या माध्यमातून नियंत्रण हा एकमेव पर्याय राज्य शासनानेही समोर केला होता. सुरुवातीला नागपुरातील खापरखेडा परिसरातील घाटावरही याचा प्रयोग तेथील जिल्हाधिकाèयांनी यशस्वी केला. त्याचे परिणाम हातात आले. परंतु, गोंदियामध्ये डड्ढोन तंत्रज्ञानाला लकवा मारल्याचा प्रकार सुरू झाला. या तंत्रज्ञानाचा वापर का बंद करण्यात आला, याबाबत प्रशासनातील कुठलाही मोठा अधिकारी बोलायला तयार नाही. वैनगंगेच्या पात्रातील घाटकुरोडा, देवरी, पिपरिया हे घाट अतिशय संवेदशील आहेत. प्रात्यक्षिकानंतर एकदा संवेदनशील वाळूघाटावर डड्ढोनने निगराणी केल्यानंतर त्यातील अपडेट व किती वाळूमाफियांनी वाळूची तस्करी केली, याचा काहीच तपशिल प्रशासनाकडे उपलब्ध नाही. एकंदर हे डड्ढोन तंत्रज्ञान जिल्हा प्रशासनालाच नको आहे, हे सिद्ध होत आहे..

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...