Wednesday, 4 July 2018

प्रशासकीय ईमारतीमध्ये जाण्याएैवजी मोडकळीस आलेल्या इमारतीतच वनविभागाचे कार्यालय


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेवर वनविभागाचा ताबा
खेमेंद  कटरे
गोंदिया,दि.04-तब्बल ५५ वर्षापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेवर आपले कार्यालय थाटणाèया वनविभागाची कुडवा नाका परिसरात भव्य अशी प्रशासकीय ईमारत गेल्या दोन वर्षापासून तयार झाली आहे.मात्र वनविभागाने आपल्या प्रशासकीय ईमारतीमध्ये न जाता आजही मोडकळीस आलेल्या राज्यउत्पादन शुल्क विभागाच्या जागेवरच कार्यालय थाटले आहे.प्रशासकीय ईमारतीचे अधिकृत लोकार्पण न झाल्याचे कारण पुढे करीत उपवनसरंक्षक कार्यालय स्थानांतरण करण्यास टाळाटाळ केली जात असतानाच (नवेगाव-न्युनागझिरा व्याघ्रप्रकल्प)वन्यजीव उसंचालकानी मात्र भाड्याचे कार्यालय सोडून गेल्यावर्षभरापासून आपले कार्यालय त्या प्रशासकीय इमारतीमध्ये सुरु केले आहे.एकीकडे वनविभाग वनमंत्र्याच्या आगमनाची वाटबघत त्या कार्यालयात जाण्यास टाळाटाळ करीत असतानाच वन्यजीव विभागाने मात्र भाड्याचे कार्यालय सोडून प्रशासकीय इमारतीतून कामकाज सुरु केले आहे.या वनविभागाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये उपवनसंरक्षक गोंदिया,वन्यजीव उपसंचालक व वनविकास प्रकल्प मंडळाचे कार्यालय एकत्र आणण्यात आले आहे.त्यापैकी उपवनसरंक्षक व वनविकास प्रकल्प कार्यालयाने अद्यापही मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये जाणे टाळले आहे.
त्यातच ज्या जागेवर सध्या वनविभागाचे कार्यालय आहे.ते शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या जेईपी.डब्लू.प्लॉट नंबर ७,सीट नंबर ३१ ची जागा ही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालकीची आहे.गेल्या ५५ वर्षापासून त्या जागेवर वनविभागाने आपले कार्यालय थाटले. उल्लेखनीय म्हणजे या जागेची लीज आजही उत्पादन शुल्क विभागाच्या नावे आहे.त्यातच २६ फेब्रुवारी २०१० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश झाडे यांनी सदर राज्य उत्पादन शुल्क विभागाची जागा वनविभागाकडून तातडीने परत करण्यासंबधी कारवाई करण्याचे पत्र तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फेत वनविभागाला दिले होते,मात्र त्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली.मूळ जागा परत मिळावी यासाठी लीजच्या दराचे चालान उत्पादन शुल्क विभागाने  भरले होते.जेव्हा की,राज्यउत्पादन शुल्क विभागाचे गोंदिया कार्यालय हे भाड्याच्या घरात सिव्हील लाईन परिसरात आहे.या विभागाला कारवाई केल्यानंतर जप्तीचा माल ठेवण्यासाठी जागा अपूरी पडू लागली आहे.१५ आक्टोबर १९६३ पासून या जागेवर वनविभागाने आपले कार्यालय थाटले आहे.तसेच ही इमारत जुनी झाल्याने दर पावसाळ्यात छतावर प्लास्टिकघालून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात येते. या कार्यालयात काम करणाèया वन कर्मचाèयांना आपले जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.एखादा कर्मचाèयाला जोपर्यंत दगाफटका या इमारतीमुळे होणार नाही,तोपर्यंत वनविभागाला आपल्या प्रशासकीय ईमारतीमध्ये जाण्याची आठवण येणार नाही असेच दिसून येत आहे.
आपल्या जागेवर इतर  विभागाने अतिक्रमण करून  कार्यालय  थाटावे व ज्याची जागा आहे. त्याने   मात्र शासनाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आपली दुकानदारी चालवावी, हे त्या विभागाच्या कार्य पद्धती व कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...