Tuesday, 17 July 2018

कांन्द्री वनविभागाची चौकशी वाऱ्यावर,बोगस नावे टाकून पैशाची आर्थिक देवाण घेवाण

मोहाडी,दि.17(नितिन लिल्हारे) : कान्द्री वनविभाग मार्फत झाडे लावण्याकरिता एप्रिल- मे महिन्यात खड्डे खोदकाम करण्यात आले असून दीड बाय दीड खड्डा खोदल्यानंतर मजुरांना २० रुपयाचा वर मिळणार होते मात्र येथील अधिकाऱयांनी मजुरांना पूर्ण पैसे दिले नसून या मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे निष्पन्नात आले आहे. याची तक्रार उपवनसंरक्षक विवेक वि. होशिंग भंडारा यांना देण्यात आली आहे. मात्र कार्यवाही थंडबस्त्यात व चौकशी वाऱ्यावर असे दिसून येत आहे.
पी.जी. कोडापे सहायक वनसंरक्षक अधिकारी भंडारा यांनी अंती जो दोषी अधिकारी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र डी.पी. चकोले वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कडून चौकशी काडून वरिष्ठां देण्यात यावी अशी मजूर वर्गाची मागणी आहे. कान्द्री वनपरिक्षेत्रातील कामात गोळ झाल्याने कान्द्री येथील अधिकारी चौकशी कशी करणार अशा प्रश्नन मजुरांना निर्माण झाला आहे. सदर प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात असल्याचे कळते, चौकशी अधिकारी वनरक्षकाची पाठराखण करीत तर नाही ना? सर्व सामान्य नागरिकांना कान्द्री वन विभागावर विश्वास बसत नाही यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मजूर वर्गाची मागणी आहे.
टांकला व सालई खुर्द या गावातील जंगलात वनविभागा मार्फत ३० हेक्टर जागेत ३३३३०/- एप्रिल – मे महिन्यात खड्डे खोदकाम करण्यात आले, परंतु मजुरांनी दीड बाय दीड खड्डा खोदल्यानंतर मजुरांना प्रती खड्डा २० रुपयाचा वर मिळणार होते. मात्र अर्धेच पैसे मिळाले.
मजुरांनी भर उन्हाळ्यात एका दिवशी १८ खड्डे खोदकाम केले आहे. मात्र येथील अधिकारी यांनी त्यांना प्रति खड्डा पैसे न देता अर्धे पैसे त्यांच्या खात्यावर टाकले तर जे मजूर कमी दिवस कामावर आले व जे मजूर अजिबात कामावर आले नाही अशा मजुरांच्या बँक खात्यावर जास्तीचे पैसे टाकण्यात आले. यांच्यावर कोणती कार्यवाही  करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मजुरांनी डी.पी. चकोले वनपरिक्षेत्र अधिकारी, बिटरक्षक डी ए फटींग, वनरक्षक गंधारे यांना मंजुरीचे पैसे कमी मिळाल्याची वारंवार मजूर वर्गांनी तोंडी तक्रार करण्यात आली होती मात्र अधिकारी गप्प बसून उडवाउडवीची उतरे देत होते. मजुरांनी ४८ तापमानात घाम गाळत काम केले मग त्यांचा घामाचा पैसा करिता मजुरांना आताही पायपीट करावी लागत आहे मग या मजुरांनी करावं काय अशा प्रश्न या ठिकाणि उपस्थित केला जात आहे.
तर या मजुरांच्या पैस्यांवर येथील वनाधिकाऱ्यांनी डल्ला मारला असल्याचे चित्र सद्य दिसत असून याची सखोल चौकशी करण्याकरिता उपवनसंरक्षक विवेक वि. होशिंग भंडारा यांनी प्रत्येक्षात सूत्र कारभार हाती घ्यावे अशी मजूर वर्गाची मागणी आहे. दोषी अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात आश्वासन उपवनसंरक्षक होशिंग यांनी दिले आहे.
 संबंधित अधिकारी तातूर मातुर  चौकशी करून प्रकरण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, जे नागरिक कामावर आलेच नाही अशा नागरिकांच्या बँक खात्यावर पैसे टाकण्यात आले आहेत, याच्यावर कोणती कार्यवाही करणार याकडे लक्ष वेधले आहे.
मजूर राब राब राबतो मात्र त्याच्या घामाचा पैशावर असे भ्रष्ट अधिकारी डल्ला मारत असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाही व्हायलाच पाहिजेत तरच असा घोटाळ्यांवर अंकुश बसेल. बोगस मजुरांच्या नावाने पैशा टाकून आर्थिक देवाण घेवाण करण्यात आले. मजुरांच्या हक्काची मजुरी पैकी अर्धेच रुपये अफरातफर केल्याचे आरोप मंजूर वर्गाकडून होत आहे. बिटरक्षक डी ए फटींग, वनरक्षक गंधारे यांनी मोठ्या प्रमाणात बोगस नावे टाकून रोपवणाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याने कळते. वनपरिक्षेत्र अधिकारी चकोले हे आपली भूमिका न बजावता दोषी अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्याने यांच्यावर सुद्दा योग्य तो कार्यवाही करून यांची तात्काळ बदली करण्यात यावी व दोषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी तक्रारकर्ते शंकर गराडे, संकपाल दमाहे, सरदू लिल्हारे, जगत लिल्हारे, रमेश आटराहे, दूरंगलाल लिल्हारे, राजकुमार अठराहे, सुशीला लिल्हारे, अंतकला दमाहे, भक्तप्रलाद मांढरे, व  मजुरांनी केली आहे.
सालई खुर्द व टाकला या ठिकाणी वनविभागा अंतर्गत रोपवन करीता खड्डे खोदण्यात आलेले होते मात्र मजुरांना त्याचा घामाचा पैसा पूर्णता न देता अधिकाऱ्यांनी पैशाची अफरातफर करून बोगस नावे टाकून पैशाची आर्थिक देवाण घेवाण करण्यात आली असून अधिकाऱ्यांची कसून चौकशी करून तात्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी प्रा. कमलाकर निखाडे सामाजिक कार्यकर्ता यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...