सेंदूरवाफा येथील घटना
साकोली,दि.25 : ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे जाणारा एक ट्रक पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. यात ३९ जनावरांची सुटका करून गौशाळेत सुखरुप रवानगी केली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकासह दोघांना अटक केली आहे.
रात्रीदरम्यान पोलीस गस्तीवर असताना टोलनाक्याजवळ पोलीस वाहन दिसताच ट्रक चालकाने ट्रकचा वेग वाढविला. पोलिसांना याबाबत शंका येताच ट्रकचा पाठलाग केला. सदर ट्रक सेंदूरवाफा गावाजवळ अडविला. त्यात ३९ जनावरे कोंबून असलेली दिसली. ट्रक क्रमांक एम.एच. ३५ के ५१८६ ला ताब्यात घेून जनावरे गौशाळा खैरी येथे सुखरुप रवानगी केली. प्राणी क्रुरतेने वागविणे प्रतिबंधक कायद्यान्वये ट्रक चालक फिरोज नईम खान पठाण (३२), साहिल छोटे शेख (२६) दोन्ही राहणार सडक अर्जुनी व किशोर माधोराव झोडे (३९) रा.केसलवाडा जि.गोंदिया यांना अटक केली. पोलीस नायक देवेंद्र खडसे, पोलीस शिपाई पटले यांनी ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment