हिदूर गावातील शनिवारी चार महिला पौमुलगौतम नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूत असताना अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने चारही महिला पाण्यात वाहू लागल्या. यावेळी एका गुराख्याने धाव घेऊन वाहून जाणार्या चार महिलांपैकी एका महिलेचा जीव वाचविला. मात्र सौमी दुर्वा, जानकी तिम्मा, चंदा गोटा या वाहून गेल्या.
घटनेची माहिती मिळताच हिदूर येथील नागरिकांनी सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोध मोहीम राबविली त्या सापडल्या नाही. त्यामुळे आज सकाळी गावकर्यांनी महसूल विभाग व पोलिस प्रशासनाच्यावतीने नदीपात्रात शोध मोहीम राबविली असता सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिन्ही महिलांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भामरागडच्या रुग्णालयात पाठवले. यावेळी घटनास्थळी तहसीलदार कैलास अंडील यांनी मृत तीनही महिलांच्या कुटुंबीयांना सायंकाळपर्यंत प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन संबंधितांच्या कुटुंबीयांना दिले.
No comments:
Post a Comment