मुंबई ,दि.04: राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी
निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं
उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपाकडून महादेव जानकर, भाई गिरकर, राम पाटील
रातोळीकर, रमेश नारायण पाटील व नीलय नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात
आली आहे.निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपाच्या पाच, शिवसेनेच्या दोन,
काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येईल. 11वी
जागा ही शेकापचे जयंत पाटील लढतील आणि सर्वपक्षीय संबंधांचा फायदा घेत तेही
बिनविरोध निवडून येतील, असे मानले जात आहे. जयंत पाटील हे
राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतात.
रायगड आणि आसपासच्या भागात भाजपा आणि शिवसेनेसाठी हे धोक्याचे आहे. त्यामुळे भाजपाने सहावा उमेदवार द्यावा आणि कसेही करून जयंत पाटील यांना पराभूत करावे, असा एक प्रवाहदेखील भाजपात आहे. काँग्रेसने शरद रणपिसे आणि मिर्झा वजाहत अख्तर यांना तर राष्ट्रवादीने बाबा जानी दुर्रानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

No comments:
Post a Comment