नागपूर,दि.04 – राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार 20
वर्षातील सर्वात मोठी भरती करणार आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगार
तरुणांना सरकारी नोकरींची संधी असणार आहे. 31 जुलैपर्यंत राज्यातील सर्वच
विभागात रिक्त असलेल्या पदांची जाहिरात निघणार आहे. त्यापूर्वी 17 जुलैला
राज्यातील सर्व विभागाला रिक्त पदाची माहिती राज्य सरकारला द्यायची
आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर
देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण
72 हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर करुन यंदा
पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी 36 हजार
पदभरती करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. शासनाच्या या निर्णयामुळे
ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच
युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.
यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार जागा खालीलप्रमाणे –
- ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे
- सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे
- गृह विभागातील 7 हजार 111 पदे
- कृषी विभागातील 2 हजार 572 पदे
- पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे
- सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे
- जलसंपदा विभागातील 827 पदे
- जलसंधारण विभागातील 423 पदे
- मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
- नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे
No comments:
Post a Comment