सडक अजुर्नी,दि.26ः-कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अजुर्नी व उपबाजार सौंदडच्या इमारतीकरीता शासकीय जमिनीचा प्रश्न गेल्या पाच वषार्पासून प्रलंबित आहे. जमिनीचा हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावी, अन्यथा २ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बाजार समिती संचालकांनी निवेदनातून जिल्हाधिकार्यांना दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देताना, बाजार समिती सभापती डॉ. अविनाश काशीवार, उपसभापती आनंद अग्रवाल, संचालक डॉ. रूकीराम वाढई, वसंत गहाणे, रूपविलास कुरसुंगे, हिरालाल चव्हाण, मिताराम देशमुख, दिलीप गभने, डॉ. भुमेश्वर पटले, शोभा परशुरामकर, छाया मरस्कोल्हे आदी संचालक उपस्थित होते
निवेदनानुसार, सडक अजुर्नी येथील कृषी उत्पन्न मुख्य बाजार समिती व उपबाजार सौंदडची स्थापना ५ नोव्हेंबर २0१२ रोजी झाली असून सडक अजुर्नी बाजार समितीचे शासकीय जमीन प्रकरण २६ जानेवारी २0१३ व सौंदड उपबाजाराचे जमीन प्रकरण २३ मार्च २0१३ पासून सुरू आहे. विशेष म्हणजे, दोन्ही बाजार समितीच्या इमारतीसाठी जमीन खरेदीसाठी शासकीय दराप्रमाणे रक्कम अदा करण्यास बाजार समिती तयार असताना सुध्दा आजपयर्ंत समितीला शासकीय जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज भाड्याच्या इमारतीमधून सुरू असून मार्केट यार्ड, गोदाम, शेड आदीसह भौतिक सुविधांचा असून असून समिती शेतकर्यांच्या हिताच्या सुविधा पुरविण्यास असर्मथ ठरत आहे.
सडक अजुर्नी बाजार समितीसाठी गट क्र. २१९ आराजी ३.८२ हे.आर. पैकी १.२0 हेआर जमीन व उपबाजार सौंदडसाठी गट क्र. ११३५ आराजी ५४.0२ हेआर पैकी 0.८0 हेआर शासकीय जमीन प्राप्तीसाठी गेल्या पाच वषार्पासून संबंधित सर्व कार्यालयांला पाठपुरावा व त्रृत्यांची पूर्तता करण्यात आली आहे. परंतु, समितीच्या शासकीय जमीन मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे १ ऑगस्टपयर्ंत समितीचे जमीन प्रकरण निकाली काढण्यात यावे, अन्यथा २ ऑगस्टपासून समितीचे सर्व संचालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment