नवी दिल्ली,दि.18 : केंद्रातील मोदी सरकार विरोधात पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला आहे. या अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार असून, त्यानंतर मतदान घेतले जाईल. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या व महिलांवरील बलात्कार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसतर्फे अविश्वास ठराव देण्यात आला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही जमावाचा हिंसाचार या विषयावर अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती.
ठरावावरील चर्चा सोमवारी घ्यावी, असा आग्रह काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी धरला. ते म्हणाले की, शुक्रवारी ३0 ते ३५ सदस्य सभागृहात नसतील. त्यामुळे सोमवार वा गुरुवार सोयीचे आहेत. तथापि ठराव महत्त्वाचा असल्याने सदस्यांनी उपस्थित राहावे, असे अनंतकुमार म्हणाले. 50 सदस्यांचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा असल्याने अध्यक्षांनी तो दाखल करून घेतला. तेलुगू देसमचा ठराव पहिला व काँग्रेसचा दुसरा; चर्चेची सुरुवात व समारोप तेलुगू देसम करेल.
No comments:
Post a Comment