Monday 16 July 2018

ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक रंगली

देवरी :१६ जुलै  स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडणूक शालेय निवडणूक राबविण्यात आली. खऱ्या लोकशाहीचे धडे शालेय जीवनातच विध्यार्थ्यांच्या अंगी रुजावे आणि सुजाण तसेच कर्तव्य दक्ष लोकप्रतिनिधींची भूमिका विध्यार्थ्यांना कळावी . राजकीय आणि निवडणूक पद्धतीचीची जागरूकता शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी सदर निवडणुकीचे आयोजन केले. सदर निवडणुकीची पूर्वतयारी विशेष निवडणूक अधिकारी नेमून करण्यात आलेली होती .  बायलॉट पेपर, मतदान कक्ष, बोटावर शाही, गुप्त मतदान पद्धती , मतदान बूथ  या पद्धतीची तयारी शालेय परिसरात करण्यात आलेली होती. शालेय वातावरण एखाद्या राजकीय निवडणुकी सारखे बघावयास मिळाले. सदर निवडणुकी मध्ये बूथ १ वर ९८ टक्के मतदान आणि बूथ २ वर ९९ टक्के मतदान झाले. सदर निवडणूकी मध्ये शाळा प्रतिनिधी साठी आर्य चांदेवार, श्याम अग्रवाल , विशाल कोल्हे, दीपक रत्नाकर , विदिशा अग्रवाल, प्रिंसि अग्रवाल , ऋतुजा देशमुख, सिद्धी थोटे, गुंजन भांडारकर आणि श्रावणी कांबळे यांनी आपले अर्ज सादर केलेले होते. मतदान प्रचारानंतर ही  निवडणूक अधिकच चुरशीची झाली होती. सदर निवडणुकी मध्ये आर्य चांदेवार यांनी १६४ मते मिळवून आणि सिद्धी थोटे हिने ८२ मते मिळवून आपला विजय पक्का केला.
विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे विजयी झालेल्या विध्यार्थ्यांना येणाऱ्या स्वातंत्र दिनी प्रमुख अतिथी आणि ध्वजारोहण करण्याचा  मान मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्या मध्ये उत्सुकता बघावयास मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून राहुल मोहुर्ले , भोजराज तुर्कार , नितेश लाडे, हर्षदा चारमोडे, वैशाली मोहुर्ले, वैशाली टेटे यांनी भूमिका बजावली. सर्व शिक्षकांनी आपली मोलाची भूमिका  बजावली. संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल आणि मुख्याधापक सुजित टेटे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...