नक्षल दमन सप्ताह अंतर्गत देवरी पोलिसांचा उपक्रम
देवरी, दि.27- नक्षल दमन सप्ताह अंतर्गत देवरी पोलिसांच्या वतीने नजीकच्या खडकी येथे एक दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन गेल्या गुरूवारी (दि.25) करण्यात आले होते.
गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे आणि गोंदियाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली खडकीच्या जिल्हा परिषद शाळेत या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 253 रुग्णांची तपासणी करून गरजूंना औषधींचे वितरण करण्यात आले. सदर आरोग्य तपासणी चमूत डॉ. आनंद चांदेवार, डॉ. गुरू कापगते, डॉ. सुरसावंत, डॉ. लक्ष्मीकांच चांदेवार यांचेसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या शिबिराला देवरीचे पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि अप्पर पोलिस अधीक्षक संदीप आ आटोळे यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.
या शिबीराला यशस्वी करण्यासाठी देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव आणि त्यांचे सहकारी आणि लायन्स क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment