Thursday 19 July 2018

मागण्या मान्य न केल्यास येत्या 2 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव घालणार-वितेश खांडेकर

देवरी,दि.19-पावसाळी अधिवेशनात राज्याचे वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेले आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केले नाही आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास अपयशी ठरले तर येत्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीचा आदर्श घेत मंत्रालयाला घेराव करणार,असा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
 पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. केंद्र सरकारच्या धर्तीवर सुरू असलेली राष्ट्रीय पेंशन योजना राज्यात लागू करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी या निवेदनातून सरकारला करण्यात आली आहे. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी मागण्यांचा योग्य विचार करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...