Tuesday, 17 July 2018

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत वादंग

नागपूर,दि.17 : मुंबईच्या अरबी समुद्रात उभ्या केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सरकारने कमी केलेल्या उंचीवरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सर्व विरोधी पक्षांनी मिळून या निर्णयाचा निषेध करीत सभात्याग केला व सभागृहाच्या पायऱ्यांवर येऊन जोरदार घोषणाबाजी केली.मनुवादी सरकारचा धिक्कार असो, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय जिजाऊ, जय भवानी जय शिवाजी यासह सरकारच्या नाकर्तेपणाविषयीच्या अनेक घोषणा देत विरोधकांनी परिसर दुमदुमून टाकला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सरकाराचा निषेध केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...