११३ वर्षाची परंपरा खंडित-कार्यकारिणी मंडळाची निवड निवडणुकीने
उपाध्यक्षपदी उमेश देशमुख सर्वाधिक १३८ तर संघटनसचिव पदी खेमेंद्र कटरे ९७ मतांनी विजयी
गोंदिया,दि.१७ : पवार, पोवार, भोयर पवार, परमार समाजाची शीर्ष सामाजिक संस्था राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे गोंदिया येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पवार महासभेसाठी ऐतिहासीक ठरले.या अधिवेशनात राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या ११३ वर्षात प्रथमच निवडणूक प्रक्रियेच्या द्वारे आगामी ५ वर्षासाठी ७ सदस्यीय कार्यकारिणी मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुरलीधर टेंभरे हे विजयी झाले तर संघटनसचिवपदी खेमेंद्र कटरे विजयी झाले.
११३ वर्षा आधी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय पवार महासभेची परंपरा या अधिवेशनात खंडित झाली. आगामी ५ वर्षासाठी नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड मतदानाच्या प्रक्रियेने करण्यात आली. निवडणूक अधिकारी प्रा.एच.एच.पारधी व सहायक निवडणूक अधिकारी अॅड. रामकिशोर बिसेन यांनी या बद्दल माहिती देताना सांगितले की एकूण ७४० मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या अध्यक्ष पदासाठी मुरलीधर टेंभरे (नागपूर) ३३ मतांनी विजयी झाले. प्रतिस्पर्धी गुुलाबचंद बोपचे (गोंदिया यांना ३४९ मते मिळाली) उपाध्यक्ष मध्यप्रदेशसाठी उमेश देशमुख (बहैर) सर्वाधिक १३८ मतांनी विजयी झाले. प्रतिस्पर्धी बवनवारीलाल पवार (बैतुल) यांना २९४ मते मिळाली.उपाध्यक्ष छत्तीसगडसाठी राजेंद्र पटले (रायपूर) ५० मतांनी विजयी ठरले प्रतिस्पर्धी डी.एन. रहांगडाले (रायपूर) यांना ३२७ मते मिळाली. उपाध्यक्ष महाराष्ट्रसाठी मोतीलाल चौधरी (नागपुर) ३७ मतांनी विजयी ठरले प्रतिस्पर्धी प्रदीप कोल्हे (नागपूर) यांना ३४२ मते मिळाली. कोषाध्यक्ष पदासाठी रमेश टेंभरे (नागपूर) २२ मतांनी विजयी ठरले. प्रतिस्पर्धी फतूलाल बिसेन (बालाघाट) यांना ३५० मते मिळाली. महासचिव पदासाठी पुष्पा बिसेन (वाराशिवनी) ६ मतांनी विजयी ठरल्या. प्रतिस्पर्धी अशोक बिसेन (बालाघाट) यांना ३६१ मते मिळाली. ११३ वर्षाच्या इतिहासात प्रथमच महासचिवपदी महिलाची निवड करण्यात आली आहे. संघटन सचिव या पदासाठी खेमेंद्र कटरे (गोंदिया) ९७ मतांनी विजयी ठरले. प्रतिस्पर्धी छत्रपाल बिसेन (गोंदिया) यांना २८९ तर सुनील गौतम (छिंदवाडा) यांना ४४ मते मिळाली.
निवडणूक अधिकारी म्हणून महासभेतर्फे नियुक्त करण्यात आलेले निवडणूक अधिकारी प्रा.एच.एच.पारधी यांनी कार्यकारिणी निवडणुकीचे प्रकरण धर्मदाय आयुक्त यांच्या न्यायालयात गेले असल्याने व त्यांच्या आदेशाप्रमाणे नियमावली प्रमाणे गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आल्याने कार्यकारिणी मंडळाची निवडणूक त्याच पद्धतीने १५ जुलै रोजी निर्धारित पद्धतीने घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आल्यानंतर प्रक्रियेला मान्यता देण्यात आली.१५ जुलै रोजी पूर्व घोषित कार्यक़्रमानुसार सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेच्या नवीन कार्यकारिणी मंडळाची गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. अंतिम मतदाता सुचीमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला सुमारे ४६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी पवार बोर्डींग येथे समाजबांधवानी रांगा लावून मतदानाचा अधिकार बजावला.
या दरम्यान मतगणना पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निकालाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.एच.एच.पारधी यांनी केली. राष्ट्रीय अधिवेशनाचे संयोजक पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष डॉ. कैलाश हरिणखेडे व श्री प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांनी नवीन कार्यकारिणी मंडळाचे स्वागत केले. नवनिर्वाचित अध्यक्ष मुरलीधर टेंभरे यांनी समाजाच्या विकासासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन संघटन सचिव आय.डी. पटले यांनी केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी प्रा.एच.एच. पारधी, सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. रामकिशोर बिसेन, मतदान अधिकारी म्हणून एन.एल. अंबुले, बी.यू. भक्तवर्ती, टी.एन.पारधी, डी.एच. रहांगडाले, व्ही.जे. टेंभरे, एस.एम. पटले, के.आर. बिसेन, एम.वाय. तुरकर, एस.वाय. तुरकर, वाय.बी. तुरकर यांनी सहकार्य केले.
मतदान प्रक्रियेत संपूर्ण देशातील मतदारांनी सहभाग घेतला ज्यात महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा राज्यातील विविध शहरातील मतदार सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment