चंद्रपूर,दि.20 – जिल्ह्यातील 12 संस्थाविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सन 2008 ते 2015-16 या कालावधीत सदर 12 संस्थांना व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास व युवक कल्याण योजनेंतर्गत अनुदान दिले होते. मात्र, या अनुदानाद्वारे 50 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप क्रीडा अधिकाऱ्यांनी केला आहे.केंद्र सरकारच्या या अनुदानाचा विनियोग केला गेलाच नाही. या अनुदानाची रक्कम 14 टक्के व्याजासह शासनाला परत करण्याचे पत्रही देण्यात आले होते. मात्र, ही रक्कम परत दिली नाही. त्यामुळे ही शासनाची फसवणूक आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment