Tuesday, 17 July 2018

भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा, खोटे ठरल्यास सभागृहात आत्महत्या करेन

नागपूर,दि.14 – सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा छापल्यावरून विधान परिषदेत शुक्रवारी गदारोळ झाला. विरोधकांनी ‘ती’ पाने नंतर जोडल्याचा आरोप सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी करताच, मी खोटा असेन, तर सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन, असे संतप्त उद्गार राष्टÑवादीचे नेते सुनील तटकरे यांनी काढले.
तटकरे यांनी भूगोलाच्या पुस्तकात काही पाने गुजरातीत असल्याचा दावा केला. ते पुस्तकही दाखविले. मराठीला अभिजात दर्जा देण्याची भाषा करणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात मराठी पाठ्यपुस्तकात गुजराती मजकूर कसा? महाराष्ट्राने अभिमान गुजरातकडे गहाण ठेवला का, असा सवाल भाई जगताप यांनी केला. धनंजय मुंडे यांनी राज्यातील पुस्तके गुजरातमधील कंत्राटदार कसा काय छापतो, असा प्रश्न केला.

सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सरकारची बाजू मांडताना विरोधकांवरच प्रत्यारोप केला. जर पुस्तकांमध्ये खरोखरच अशी चूक असती, तर आतापर्यंत आरडाओरड झाली असती. तटकरे यांनी सादर केलेल्या संबंधित पुस्तकाच्या प्रतीमध्ये पाने जोडली गेली आहेत, असा आरोप पाटील यांनी करताच सभागृहात एकच गोंधळ झाला. या गोंधळात सभागृह दोनदा तहकूब करण्यात आले. त्यानंतर, परत कामकाज सुरू झाल्यानंतर तटकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
आम्ही भूगोलाच्या पुस्तकात गुजराती छापून आणले, हा चंद्रकांत पाटील यांचा आरोप दुर्दैवी आहे. मी तसे केल्याचे वा माझा आरोप खोटा असल्याचे सिद्ध केल्यास मी सभागृहातच विष घेऊन आत्महत्या करेन, असा इशारा तटकरे यांनी दिला. यानंतर, गोंधळ वाढल्याने सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...