नागपूर,दि.18 – राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षकांना दिवाळी पुर्वीच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात राज्यातील शासकीय कर्मचा-यांच्या पगारात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचा-यांना याचा लाभ मिळेल. यात जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी, पोलिस, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान सातव्या वेतन आयोगासाठी लढणार्या संघटनाना 20 टक्केवर काम करणार्या शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी यांच्याशी काही सोयरसुतक नसल्याचेही चित्र यामाध्यमातून बघावयास आले.
दोनच दिवसांपूर्वी आमदार विक्रम काळे यांनी यासंबंधी सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून राज्यातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा अशी मागणी कर्मचा-यांतर्फेही करण्यात येत होती. आमदार काळे यांच्या पत्राची तातडीने दखल घेत त्यांना लिहिलेल्या उत्तरात मुनगंटीवार यांनी समितीचा अहवाल ४ महिन्यांत शासनाला प्राप्त होईल. यंदा दिवाळी पूर्व सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विचार असल्याचे म्हटले होते. अखेर आज बुधवारी राज्य कर्मचा-यांना दिवाळीपूर्वीच सातव्या वेतन आयोगाचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली.
No comments:
Post a Comment