चिचगड , दि.29- नक्षल दमन सप्ताह अंतर्गत चिचगड पोलिसांच्या वतीने नजीकच्या पिपरखारी येथे एक दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन गेल्या गुरूवारी (दि.25) करण्यात आले होते.
गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे आणि गोंदियाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबीराचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांचे हस्ते करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, माजी आमदार रामरतन राऊत, चिचगडचे वनपरिक्षेत्राधिकारी काशिकर, डॉ भोंगाडे, सरपंच धनश्री गंगाकचूर, उपसरपंच मुनेश्वरी भोगारे, देवरी पंचायत समितीचे उपसभापती गणेश सोनबोईर, देवांगणा भोयर,रेखा ताराम, किरण डोये, पोलिसपाटील संगीता भोयर, साहिन सय्यद, ग्रामसेवक एस जी पटले, माजी सरपंच अशोक मडावी, लक्ष्मण नरेटी, दिपक मडावी, पोलिस निरीक्षक पवार,, माळी, पोलिस उपनिरीक्षक गांगुर्डे, नरेडा आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबीरामध्ये 300 रुग्णांची तपासणी करून गरजूंना औषधींचे वितरण करण्यात आले.
.
या शिबीराला यशस्वी करण्यासाठी चिचगडचे ठाणेदार नागेश भास्कर यांनी सहकार्य केले. शिबीरात लाभार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या 10 ऑक्टोबर 1992 मध्ये नक्षली हल्ल्यात पिपरखारीचे पोलिसपाटील दिपक मडावी यांचे वडील केशवराव दामाजी मडावी यांचा बळी गेला होता. त्यांच्या स्मारकाची निर्मिती चिचगड पोलिसांच्या वतीने करण्यात आला,
दरम्यान, गेल्या 10 ऑक्टोबर 1992 मध्ये नक्षली हल्ल्यात पिपरखारीचे पोलिसपाटील दिपक मडावी यांचे वडील केशवराव दामाजी मडावी यांचा बळी गेला होता. त्यांच्या स्मारकाची निर्मिती चिचगड पोलिसांच्या वतीने करण्यात आला,
No comments:
Post a Comment