देवरी:2 काल सिमेंट नाली कोसळल्याचे वृत्त बेरार टाइम्सने प्रकाशित करताच देवरी नगरपंचायतने बातमी ची दखल घेत नाली सुधार कामाला गतीने सुरुवात केल्याचे दिसून येते.
Monday, 2 October 2017
Sunday, 1 October 2017
भोंगळ कारभारः देवरी येथे चार दिवसापूर्वी केलेली नाली कोसळली

देवरी,दि.01 (प्रतिनिधी)- नावाजलेल्या देवरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.4 मध्ये चार दिवसापूर्वी तयार करण्यात आलेली सीमेंट क्रॉंक्रिटची नाली आज झालेल्या पावसात कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणाला घेऊन नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराविषयी देवरीकरात चांगल्याच चर्चा रंगल्याचे दिसून आले.
सविस्तर असे की, देवरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र 4 मध्ये आंबीलकर वाड्यापासून ते संगीडवार वाड्यापर्यंत सांडपाणी वाहून जाण्यासाठी कॉंक्रिटची नाली तयार करण्यात आली. सुमारे 50 मीटर लांबीची ही नाली केवळ चार दिवसापूर्वीच तयार करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. आज दुपारी झालेल्या पावसात सदर नाली पूर्णतः कोसळली. परिणामी, नगर पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या सुमार दर्जाचे दर्शन देवरी करांना घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
यासंबंधात सोशियल मिडीयावर सुद्धा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. याविषयी एका नागरिकाने तर 'अच्छे ठेकेदार की पहचान' अशी उपरोधिक टीका केली.
देवरी विभागातील वीज कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात
सविस्तर असे की महावितरणच्या देवरी विभागातील विद्युत सहायक, वीजसेवक आणि उपकेंद्र सहायक यांचा कंत्राटी नियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे. नियमानुसार यांना कंत्राटी कार्यकाल संपल्याने नियमित करणे आवश्यक आहे. यासंबंधी फेडरेशनच्या माध्यमातून देवरीचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे यांना वारंवार विनंती करण्यात आली.मात्र, कार्यकारी अभियंत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे या मागणीला ते नेहमी कचऱ्याची टोपली दाखवीत आहे.
कार्यकारी अभियंत्यांच्या या धोरणाला कंटाळून शेवटी येत्या 4 तारखेपासून साखळी उपोषण करण्याची पाळी फेडरेशनवर आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तेव्हा मोदीं म्हणाले होते बुलेट ट्रेन फक्त दिखाव्यासाठी, जुना व्हिडिओ व्हायरल
मुंबई,दि.01(विशेष प्रतिनिधी) – बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी बुलेट ट्रेन ही केवळ दिखाव्यासाठी असेल, त्यातून लोक प्रवास करणार नाहीत पण त्यातून भारताची ताकद जगाला कळेल असे वक्तव्य केले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ 2013 सालचा आहे. त्यावेळी गुजराते मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते. तेव्हा उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी बुलेट ट्रेनबाबतचे आपले मत व्यक्त केले होते. “आपण छोट्या छोट्या नेहमीच करत असतो, पण छोट्या गोष्टींमधून काही साध्य होणार नाही. त्यासाठी मोठे केले पाहिजे.”असे मोदी म्हणाले होते.
मोदी पुढे म्हणतात,”मी एकदा पंतप्रधानांना भेटलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की संपूर्ण चीनची चर्चा कुठेच होत नाही. ते जगाला फक्त शांघाई दाखवतात. पूर्ण चीन कुठे दाखवतात., त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून मी पंतप्रधानांना सांगितले की अहमदाबाद-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन सुरू करा. या बुलेट ट्रेनमध्ये कुणी बसणार नाही. पण जगाला आपल्या गोष्टीचा अंदाज येईल. जगाला दाखवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात.” दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊ लागल्यापासून मोदींवर जोरदार टीका होत आहे.
नुकत्याच एल्फिन्स्टन रोड येथे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वसामान्यांमधून बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. तसेच मनसेसह अनेक राजकीय पक्षांनीही बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला आहे.
KBC 9 ला मिळाली पहिली महिला ‘करोडपती
जमशेदपुर,दि.01(वृत्तसंस्था) – केबीसी सीजन-9 ला आपला पहिला करोडपती मिळाला आहे. जमशेदपूरच्या अनामिका मजूमदार या सीजनच्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. अनामिका यांनी 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर 7 कोटींच्या प्रश्नासाठी सुद्धा क्वालिफाय केले. मात्र, त्यांनी जॅकपॉट प्रश्नाकडे जाण्यापूर्वी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला आहे. अनामिका रविवारी संध्याकाळी मुंबईहून जमशेदपूरला पोहोचणार आहेत. अनामिका मजूमदार दोन मुलांच्या आई आहेत. त्या जमशेदपूरच्या साकची येथील न्यु बाराद्वारी येथे राहतात. सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अनामिका ‘फेथ इन इंडिया’ नावाचे एनजीओ चालवतात. केबीसी 9 मध्ये जिंकलेली 1 कोटींची रक्कम झारखंडच्या ग्रामीण भागातील सेवेत लावणार असे त्यांनी सांगितले आहे. एनजीओ स्थापित करण्यापूर्वी सुद्धा त्या नेहमीच गरीब लहान मुलांच्या मदतीसाठी तत्पर होत्या. त्यांना डान्सची आवड आहे. आपल्या घराजवळ राहणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांना सुद्धा त्या डान्स शिकवतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या मुलांसोबत एक नाटक सुद्धा सादर केले होते. कॅशलेस इंडियावर आधारित या नाटकाचे सर्वत्र कौतुक झाले होते. नदीच्या काठावर आयोजित झालेल्या त्या कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनीही उपस्थिती लावली. मुंबईतील गोरेगाव येथे गुरुवारी झालेल्या केबीसी – 9 च्या शोमध्ये त्या 7 कोटींच्या जॅकपॉट प्रश्नापर्यंत पोहोचल्या.यापूर्वी याच सीजनच्या एका एपीसोडमध्ये हरियाणाचे वीरेश चौधरी यांनी 50 लाख रुपये जिंकले होते.
*नागपूरमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास पागल झाला आहे- खा.नाना पटोले
*पुन्हा खासदार नाना पटोले यांनी दसरा उत्सवात केंद्र व राज्यशासनावर डागली तोफ*
लाखनी ३०:भंडारा गोंदिया क्षेत्राचा विकास काही मोट्या राजकारण्यांनी जाणून बुजून हेतूपूरस्पर अडकऊन ठेवला आहे आणि त्याच कारणामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात सुद्धा विकास पागल झालेला आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात विकास पागल होण्यामागे मुख्य कारण म्हणजे नागपूर आहे असा घणाघाती आरोप खासदार नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे आयोजित दसरा उत्सवा निमित्त केला आहे.
नाना भाऊ पुढे बोलतांना बोलले की भंडारा गोंदिया क्षेत्रात विकास खुंटलेला आहे . अदानी विडिओकॉन सारख्या कंपण्या असून सुद्धा त्याच्या फायदा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना झाला नाही त्यामुळेच सतत क्षेत्रामध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे.साकोली तालुक्यात लवकरच भेल कंपनीचा शुभारंभ करणार अशे सुद्धा त्यांनी सांगितलं भेल चे सर्व अडथळे दूर करण्यात यश आले आहे आता लवकरच क्षेत्रातील अडीच ते तीन हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिडेल अशे त्यांनी सांगितलं.
खासदार नाना पटोले यांनी म्हटलं की नोट बंदी व जिएसटी मूळे मंदीचा सावट आहे.जिएसटी मुळे व्यापार मंदावले आहेत पेट्रोल 35 ते 40 रुपयांच्या दराने उपलब्ध व्हायला पाहिजे परंतु सरकारने पेट्रोल चे दर 80 रुपये प्रति लिटर करून सामान्य नागरिकांची कंबर मोडली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात जिएसटी व पेट्रोल मुळे मिडनाऱ्या कराचा उपयोग किती प्रमाणात सामान्य नागरिकांना होतो याच जाब येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला विचारणार अशे म्हटले . सरकारच्या मनमानी कारभारामूळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे लवकरच जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या विकासा च्या दृष्टीने नवीन पाऊल उचलण्याच्या प्रयन्त करू त्यात आपला मुलगा आपला भाऊ समजून मला आशीर्वाद द्याल हे सुद्धा खासदार नाना भाऊ पटोले सांगण्यास विसरले नाहीत. नाग नदीच्या पाण्यामुळे गोसे खुर्द चा पाणी अशुद्ध होत चालल आहे त्यामुळेच त्यावर सुद्धा उपाययोजना करू व लवकरच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात गोसे खुर्द चा पाणी पोहचवू त्याचप्रकारे ऑनलाइन प्रकियेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली आहे अशे खासदार नाना पटोले बोलले.दसरा उत्सवाच्या कार्यक्रमात साकोली विधानसभेचे भाजप चे आमदार बाळाभाऊ काशीवर उपस्थित होते मात्र नागपूर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात नाना भाऊ यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपामुळे विधानपरिषदेचे भाजप चे आमदार परिनय फुके यांची गोची झाली होती त्यामूळे आज पुन्हा एकदा नाना भाऊ दसरा उत्सवाच्या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या वर तोफ डागनार ह्या भीतीमुळेच दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाला भाजप चे आमदार परिनय फुके उपस्थित राहिले नाही अशी चर्चा जणसामान्यात रंगली आहे . येणाऱ्या काळात नाना भाऊ कशापद्धतीने सरकारला घरचा अहेर देतील हे बघायचं आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...


