देवरी,01- महावितरणच्या देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या अडेलतट्टू धोरणाला कंटाळून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन येत्या बुधवारपासून (ता.4) आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे.
सविस्तर असे की महावितरणच्या देवरी विभागातील विद्युत सहायक, वीजसेवक आणि उपकेंद्र सहायक यांचा कंत्राटी नियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे. नियमानुसार यांना कंत्राटी कार्यकाल संपल्याने नियमित करणे आवश्यक आहे. यासंबंधी फेडरेशनच्या माध्यमातून देवरीचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे यांना वारंवार विनंती करण्यात आली.मात्र, कार्यकारी अभियंत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे या मागणीला ते नेहमी कचऱ्याची टोपली दाखवीत आहे.
कार्यकारी अभियंत्यांच्या या धोरणाला कंटाळून शेवटी येत्या 4 तारखेपासून साखळी उपोषण करण्याची पाळी फेडरेशनवर आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment