Tuesday, 24 October 2017

ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानपूर्वक अधिस्वीकृतीपत्रिका


DSC_0116
नागपूर, दि.24 : वृत्तपत्र क्षेत्रात दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार दि.भा. घुमरे, मा.गो.वैद्य, कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार जयंत हरकरे यांना शासनाची अधिस्वीकृतीपत्रिका सन्मानपूर्वक त्यांच्या निवासस्थानी देण्यात आले. राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी तसेच माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी अधिस्वीकृतीपत्रिका सन्मानपूर्वक ज्येष्ठ पत्रकारांना प्रदान केली.यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रदीप मैत्र, संजय तिवारी, उन्मेश पवार तसेच जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रातून संपादक म्हणून निवृत्त झालेले दि.भा.(मामा)घुमरे यांच्या मेडिकल कॉलेज परिसरातील निवासस्थानी जाऊन त्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे पत्रकारांना दिल्या जाणारे अधिस्वीकृतीपत्रिका सन्मानपूर्वक देवून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार तसेच नरकेसरी प्रकाशनचे माजी अध्यक्ष मा.गो.वैद्य यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानपूर्वक अधिस्वीकृतीपत्रिका प्रदान करण्यात आली.
वृत्तपत्रक्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
दैनिक लोकमत या वृत्तपत्राचे सेवानिवृत्त झालेले संपादक कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार जयंत हरकरे यांनाही त्यांच्या निवासस्थानी जाऊन शासनाची अधिस्वीकृतीपत्रिका प्रदान करण्यात आली. विभागीय अधिस्वीकृती समिती तसेच राज्य अधिस्वीकृती समितीने वृत्तपत्र क्षेत्रात प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर वयोवृद्ध झालेल्या ज्येठ पत्रकारांचा अधिस्वीकृतीपत्रिका देवून गौरव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सन्मानपूर्वक शासनाची अधिस्वीकृतीपत्रिका देवून
त्यांचा सन्मान केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...