Monday, 23 October 2017

मानेगावच्या परिसरात रानगव्याचा मृत्यू


911132e3-3e8c-4af8-b0f5-6efb96a753f6
आमगाव,दि.23- तालुक्यातील मानेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या दहेगाव- मानेगावच्या शेतशिवारात रविवारला एका रानगव्याच्या मृतदेह मिळाल्याने, संपूर्ण गावात खळबळ उडाली. गावकऱ्यांनी याची माहिती तात्काळ वनविभागाला व वन्यप्रेमींनी दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत रानगव्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून विषारी धानपिक खाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याला तलावाजवळ असलेल्या एका बांध्याजवळ गव्याचा मृतदेह दिसल्याने त्याने याची माहिती गावातील वन व्यवस्थापन समितीला दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला असता शेतातील धान पिकाची पाहणी केली असता पिकांवर फवारणी केल्याचे आणि गव्याने धान पिकाची नासाडी केल्याचे निदर्शनास आले. यावरून प्राथमिक दृष्ट्या या गव्याचा मृत्यू विषबाधाने झाला असावा असा अंदाज आहे. हा गवा अंदाजे तीन वर्षाचा असल्याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...