देवरी,दि.06- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवरी नजीकच्या मरामजोब घाटात गुरुवारच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका युवा बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. आज त्या बिबट्याने शवविच्छेदन करून त्याचेवर देवरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर असे की, नागपूर-रायपूर महामार्गावर स्थित मरामजोब शिवारात असलेल्या पितांबरटोला घाटात आज रात्री सुमारे 12 च्या सुमारास रस्ता ओलांडत असलेल्या एका अडीच वर्षाच्या बिबट्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. याचे विषयीची माहिती गस्तीवरील एका पोलिस कर्मचाऱ्याने वनविभागाला दिली. या घटनेची तत्काळ दखल घेत वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये सहायक वनसंरक्षक पाटील आणि शेख, वनपरिक्षेत्राधिकारी मारबते, रोशन राठोड, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी चोपडे, क्षेत्रसहायक डोरले,ताकसांडे आणि वनरक्षक संजय कटरे, यु. टी. राऊत यांचा समावेश होता.
आज दुपारी मृत बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. कोडेकर आणि डॉ आकांत यांच्या चमूने केले. शवविच्छेदनानंतर मृत बिबट्यावर देवरी येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment