Saturday, 28 October 2017

ना. रामराजे प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी


Image result for ramraje nimbalkar

पुणे,28- रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठाण, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रा. रामकृष्ण मोरे जीवन पुरस्कार यंदा विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक-निंबाळकर यांना जाहीर झाला असून भारती विद्यापीठाचे कुलपती आ. पतंगराव कदम यांचे हस्ते दि. 8 नोव्हेंबरला पुणे येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
जगतगुरू संत तुकडोबांची पगडी, उपरणे,गाथा, तुळशीचे रोप, सन्मानपत्र आणि पंचेवीस हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 
प्रतिष्ठाणच्या वतीने दरवर्षी माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोेरे यांचे नावाने जीवनगौरव पुरस्कार राजकारण,समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता, कृषीक्षेत्रात उतुंग योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. ना. रामराजे यांनी मंत्रिपद आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून मान, खटाव, खंडाळा आणि फलटण या दुष्काळी भागाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे दुष्काळी पट्ट्यात पाणी पोचले. तसेच औद्योगिक वसाहती उभ्या राहल्याने तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या. या कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे प्रतिष्ठाण तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दि. 8 नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार भवन, नवीपेठ, पुणे येथे पुरस्काराचे वितरण समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक प्रा. सदानंद मोरे, आ. निलमताई गोऱ्हे, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब तापकिर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...