Saturday, 28 October 2017

मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


????????????????????????????????????


विशेष प्रतिनिधी
मुंबई,दि.२८ ::- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसून केवळ फेरबदल केले जाणार आहे.यावेळी काही मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. तसेच नवीन चेह-यांना संधी दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप सरकारला ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी एका ठिकाणी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सरकारने यशस्वीपणे राबवलेल्या योजना, २०१९ मध्ये होणाºया लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तसेच आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सविस्तर माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार नसून फेरबदल होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. फेरबदलात काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार आहे. तसेच नवीन चेहºयांना संधी दिली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेसला ‘रामराम’ केल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून एनडीएला पाठिंबा जाहीर करणाºया नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही निश्चितच निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले..भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अद्याप कोणत्याही मंत्र्यांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत. तसेच गेल्या तीन वर्षांत काही मंत्र्यांची कामगिरी लक्षवेधी झालेली नाही. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ फेरबदलातून कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आणि कुणाला संधी मिळेल, अशी चर्चा आता राजकीय वतुर्ळात सुरू आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...