बुलडाणा,दि.12- गावातील अवैध व्यवसाय बंद करण्याकरिता वारंवार बिबी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही अवैध व्यवसाय बंद होत नसल्याने महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘देशी दारूविक्री’चे दुकान थाटून एक दिवसीय आंदोलन केले.
लोणार तालुक्यातील बीबी या गावामध्ये हातभट्टीची दारू, वरली मटका, देशी व विदेशी दारू, गांजा, पत्त्यांचे क्लब यासारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हे अवैध व्यवसाय बंद करण्याकरिता येथील सुनीता श्रीकिसन भांड, लता सखारा घाईक, जिजा सदावर्ते, भानुदास लहाने, संतोष इंगळे, बाळू इंगळे यांनी वारंवार बीबी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला निवेदन दिले. विनंती करून सदर अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली. मात्र पोलिस प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अवैध देशी दारूविक्री आंदोलन केले.
No comments:
Post a Comment