गोंदिया,08- गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचा विद्यार्थी स्वरूप सेवा पारधी या विद्यार्थ्याची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील शासकीय विद्यानिकेतन मध्ये पुढील शिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव जि.प. शाळेत स्वरुप हा 6 व्या वर्गाचा विद्यार्थी आहे. या निवडीबद्दल शाळेत मुख्याध्यापक एन के बिसेन, शिक्षक बी.के. कटरे, एन आर शहारे, के.एस कुसराम, राज कढव आदीनी अभिनंदन केले. स्वरूपने आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि सर्व शिक्षकांना दिले. स्वरुपच्या या यशाबद्दल तो संपूर्ण तालुक्यात कौतुकास पात्र ठरला असून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव सर्वच स्तरातून होत आहे.
No comments:
Post a Comment