Saturday, 28 October 2017

भगवान सहस्त्रबाहू यांची जयंती उत्साहात साजरी


गोंदिया,28- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कलार समाजाचे आराध्य दैवत भगवान सहस्त्रबाहू यांची जयंती काल (ता.27) शुक्रवारी स्थानिक पिंडकेपार रोडस्थित समाज भवानात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरवात समाजाचे आराध्य दैवत भगवान कार्तवीर्य सहस्त्रबाहु, नारायण गुरु आणि आई जैना देवी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व आराधने  करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक ईटनकर हे होते. यावेळी माजी अध्यक्ष अशोक लिचडे, सचिव सुखराम खोब्रागडे,कोषाध्यक्ष श्री शालीकराम जी लिचडे, मोहन रामटेककर,युवा अध्यक्ष चंद्रशेखर लीचडे, युवा सचिव वरुण खंगार, मनोज किरणापूरे, मनोज भांडारकर, रोशन दहीकर, देवानंद भांडारकर, अतुल खोब्रागडे, सौ. वर्षा तिडके, सौ.  ज्योती किरणापुरे, सौ. सिमा ईटानकर, सौ. हर्षाताई आष्टीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक सुखराम खोब्रागडे यांनी केले. यावेळी समाजाच्या उत्थाना साठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, समाजमंडळाच्या आजीवन सदस्य नोंदणीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सचिव खोब्रागडे यांनी केले, उपस्थितांचे आभार उमेश भांडारकर यांनी मानले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.




No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...