Tuesday 31 October 2017

कृषिपंपधारकांना दिलासा


.
नागपूर,31-मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांटे वीजबिल थकल्याने त्यावरील व्याज आणि दंडाची रक्कम वाढत आहे. वीजबिलापोटी १९ कोटींहून अधिक असलेला शेतकऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना’ आणली. या योजनेच्या माध्यमातून वेळेत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांवरील व्याजाची आणि दंडाची रक्कम माफ करण्यात येणार असल्याचो ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.

‘शेतकऱ्यांसाठी आपण वेगळी योजना घेऊन आलो आहे,’ अशा शब्दांत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नव्या योजनेची घोषणा केली. ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची असल्याचे सांगत वेळेत थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांवरील व्याजाचे आणि दंडाचे रुपये माफ होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर १९ हजार २७२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील १० हजार ८९० कोटी रुपये मूळ वीजबिलाची रक्कम आहे. ८ हजार १६४ कोटी रुपये थकबाकीवरील व्याजाचे आणि दंडाचे २१८ कोटी आहे. ही थकबाकी आजची नाही. सन २०१२पासून शेतकऱ्यांवर थकबाकी असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

४१ लाख शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. २५ लाख ४१ हजार शेतकऱ्यांकडे ग्राहक मीटर आहे. १५ लाख ४१ हजार ग्राहकांकडे मीटर नाही. शेतकऱ्यांच्या एका वीजकनेक्शनला सव्वा लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांकडून केवळ ३ हजार रुपये वसूल केले जातात. शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी साडेसहा रुपये प्रती युनिटनुसार खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांकडून केवळ १ रुपये ८० पैसेच वसूल केले जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
३० हजारांच्या आत थकबाकी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना पाच टप्पे आखून देण्यात आले आहे. ३० हजारांच्यावर थकबाकी असेल त्यांना दीड दीड महिन्यांच्या १० टप्प्यांमध्ये वीजबिल भरायचे आहे. डिसेंबर २०१७ मध्ये पहिला टप्पा, मार्च २०१८ मध्ये दुसरा टप्पा, जूनमध्ये तिसरा, सप्टेंबरमध्ये चौथा आणि डिसेंबर २०१८ मध्ये पाचवा टप्पा आखून देण्यात आला आहे. येत्या सात दिवसांत चालू वीजबिल भरा, असे आवाहन बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. सात दिवसांत चालू वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...