Tuesday, 10 October 2017

महसुल कर्मचाèयांचे विविध मागण्यासांठी आजपापून काम बंद आंदोलन

IMG-20171010-WA0011

गोंदिया,दि.१०: महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या निर्देशानुसार महसूल विभागातील सर्व कर्मचार्यांनी विविध मागण्यासाठी आजपासून (मंगळवार) बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केली.याआधी पुरवठा विभागाचे सर्व कर्मचार्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. शासनाने त्यांच्या मागण्या वेळीस पुर्ण न केल्याने महसूल विभागाचे सर्व कर्मचारी सुद्धा बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले आहेत.महाराष्ट्रासह जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरु आहेत व होणार आहेत. या निवडणूकीच्या व इतर महसूली कामावर महसूल कर्मचाèयाच्या कामबंद आंदोनाचा प्रतिकुल परिणाम होणार आहे. जिल्ह्यात महसूल विभागाचे जवळपास हजारावर कर्मचारी आहेत. या कामबंद आंदोनात सहभागी झालेल्या महसूल कर्मचाèयांनी तहसिल कार्यालय,उपविभागीय कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणा दिल्या.यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राजेश मेमन, झरारीया, आशिष रामटेके,राकेश डोंगरे,सुरेश हुमणे, सुपचंद लिल्हारे,पी.झेड.बिसेन,आबिद पठाण,एम.बी.वंजारी,श्रीमती एस.डी.ंखंडारे,श्रीमती पुंडकर,एस.एस.भोयर,सारिका बनसोड,सारिका कावळे,अंशुल हिरकणे,आकाश चव्हाण,चैताली मानकर,माधुर मेश्राम,श्रीमती शेट्टे आदिंनी आंदोलनात सहभाग घेतला.तर तहसिल कार्यालयातील कर्मचार्यांनी तहसिलदार गोंदिया यांना आंदोलनाच्या मागण्याचे निवेदन सादर केले.
दिवाळी सण तोंडावर आला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाèयानी काम बंद आंदोलन केल्यास सामान्य नागरीकांची अनेक कामे खोळंबणार आहेत. शिधा दुकानांमध्ये (रास्त भाव धान्य) संपूर्ण अन्न धान्य, साखर व रॉकेलचा तुटवडा निर्माण होईल, तसेच शिधा पत्रिकांचे वाटप आदी कामे थांबली आहेत. विविध दाखले, परवाण्यासह महसूली कामे ठप्प होणार आहेत. यामुळे सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.राज्यसंघटनेने दिलेल्या आदेशानुसार उस्फूर्तपणे कर्मचारी व काही अधिकारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.मागण्यामध्ये महसूल लिपीकाचे पदनाम बदलुन महसूल सहाय्यक असे करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार शासण निर्णय पारीत करणे.नायब तहसिलदार पदाचा ग्रेड पे चार हजार तीनशे वरुन चार हजार आठशे दिनांक ०१/०१/२००६ पासून मान्य करण्यात आला होता. त्या नुसार शासन निर्णय पारित करणे. अव्वल कारकून (वर्ग – ३) या संवर्गाची वेतनश्रेणी मधील त्रूटी दुर करणे बाबात.शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत मान्य करण्यात येणार होते. त्यानुसार शासन निर्णय पारित करणे. पुरवठा विभागातील पुरवठा निरिक्षक संवर्गातील पदे हे पदोन्नतीचे असल्यामुळे सरळ सेवेने न भरणेबाबत.नायब तहसिलदारांचे सरळ सेवा भरतीचे पदे प्रमाण तेहत्तीस टक्केवरुन वीस टक्के करुन पदोन्नतीचे प्रमाण ऐंशी टक्के पदे मंजुर केलेल आहे. त्यानुसार शासन निर्णय पारीत करणे.आकृतीबंधाबाबत सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात लिपिक, अव्वल कारकुन, नायब तहसिलदार व इतर पदे वाठविलेली आहेत. यामध्ये कोणतीही कपात न करता. त्वरीत मंजुरी देवून त्या नुसार शासन निर्णय पारीत करणे.इतर विभागाच्या जसे संजय गांधी, गौण खणिज,रोहयो, निवडणूक, पुरवठा व महसूलेत्तर इतर कामासाठी नव्याने आकृतीबंध तयार करुन त्वरीत सादर करुन मंजूरी आदेश निर्गमित करणे.महसूल विभागातील व्यपगत झालेले पदे पुनर्जिवित करण्याची कार्यवाही तत्काळ करावी व महसूल विभागाव्यतिरिक्त इतर विभागांचे जसे संजय गांधी, गौण खणिज, रोहयो, निवडणूक व इतर विभाग यांचे व्यपगत झालेल्या पदांचा विचार करुन संबधित विभागात पदे पुनर्जिवित करण्याचा प्रस्ताव तयार करुन मंजुरी आदेश निर्गमित करणे.महसूल विभागातील वर्षानुवर्षापासून कार्यरत असलेली पदे अस्थायी स्वरुपाची असून ती स्थायी करण्यात यावी यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...