देवरी येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ.भांडारकर |
स्थानिक सनसाईन पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी रामटेककर हे होते. यावेळी मंचावर देवरीचे नगरसेवक प्रवीण दहिकर, प्रा. डॉ.सुधीर भांडारकर, श्री. गड्डमवार, यादोराव पंचमवार, गुणेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेेश भदाडे यांनी केले, यावेळी मान्यवर वक्त्यांनी उपस्थित समाजबांधवांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन जागेश्वर ठवरे यांनी केले, उपस्थितांचे आभार संदीप तिडके यांनी मानले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रा. डॉ. सुधीर भांडारकर यांना संशोधन कार्यात पुरस्कार मिळाल्याने समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलीप दुरुगकर, सुशील शेद्रे, गौरीशंकर दहिकर, नितीन रणदीवे, प्रकाश भदाडे, रेवाराम ठवरे आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment