Tuesday, 24 October 2017

जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा भव्य बैलबंडी मोर्चा


e5258042-f19a-4923-bb30-664449c46ecd
भंडारा,दि.२३ः – धान उत्पादक जिल्हा समजल्या जाणाèया भंडारा जिल्ह्यात दरवर्षी दिवाळी आधी शेतकèयांना शासनाने ठरवून दिलेल्या किमतीनुसार धान्य विकता यावे यासाठी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र उघडण्यात येतात. मात्र अद्यापही आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्याने; धान्य खरेदी केंद्र लवकरात लवकर उघडण्यात यावे या मागणीला घेऊन शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख इंजि.राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात सोमवारला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.जिल्हाधिकार्यांनी स्वतः मागण्यांचे निवेदन स्विकारावे अशी आंदोलकांची मागणी होती,त्याकडे कानाडोळा केल्याने बैलबंडी मोर्चा निवेदन न देता परत मुख्यमंत्र्याना स्पीड पोस्टाने निवेदन पाठवले.जिल्हाधिकारी हे सुध्दा शेतकरी विरोधी असल्यानेच धान खरेदी केंद्र सुरु होऊ शकले नसल्याचा आरोप शिवसेनेच्या आंदोलकांनी केला आहे.
जिल्ह्यातील शेतकèयांची स्थिती पाहता या हंगामात सुद्धा दिवाळीपूर्वी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करणे आवश्यक होते. मात्र या वर्षी दिवाळी लोटून सुद्धा आधारभूत धान्य खरेदी केंद्र न सुरु झाल्यामुळे शेतकèयांना आपला माल मिळेल त्या भावाने खाजगी व्यापा?्याला कृषी उत्पन्न बाजार समितीत नेऊन विकावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकèयांची होत असलेली आर्थिक पिळवणूक पाहता लवकरात लवकर आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी या मोर्चा चा निमित्ताने करण्यात आली आहे.आंदोलनात युवासेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे,विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख जितेश इखार, तुमसर तालुका प्रमुख नरेश उचिबगले,मोहाडी शिवसेना तालुक प्रमुख पवन भाऊ,साकोली शिवसेना तालुका प्रमुख किशोर चन्ने,तुमसर शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर,भंडारा शिवसेना शहर प्रमुख सुर्यकांतजी इलमे तसेच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख,विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख,शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...