Monday 23 October 2017

रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच


23-gnd-3_20171022519


सडक अर्जुनी,दि.23 : गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे. काही प्रवासी ही प्रतिक्षा रेल्वे रुळावरच बसून करत असल्याचेही दृश्य येथे पहायला मिळते.
या मार्गावरून दररोज किमान १० ते १२ प्रवासी गाड्या धावतात. मात्र खोडशिवनीला रेल्वे स्थानकच नाही, फक्त रेल्वे सिग्नलची एकमेव केबिन आहे. या ठिकाणी रेल्वे विभागातील कुठलाही कर्मचारी नियुक्त केलेला नाही. त्यामुळे येथे प्रवाशांना तिकिटाची विक्री चक्क एका पानटपरीवरून केली जाते. या टपरीवर असलेली महिलाच प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थानकांची तिकिटे विकते.
खोडशिवनी हे गाव तसे नवीन नाही. ते स्वातंत्र् योत्तर काळातले असले तरी आता त्याला किमान ५० ते ६० वर्षांचा इतिहास आहे. या गावाला एक लहानसे रेल्वे स्थानक मिळावे अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...