Sunday, 15 October 2017

चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली, दि.१४: कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत टवे येथील जंगलात आज दुपारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक जहाल महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.टिपागडनजीकच्या टवे येथील जंगलात आज दुपारी सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. साडेचार वाजताच्या सुमारास पोलिस दिसताच नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही जोरदार गोळीबार केला. यात एक महिला नक्षलवादी ठार झाली. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एक बारा बोअर बंदूक व अन्य नक्षल साहित्य आढळून आले. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...