शुल्क आकारणी निश्चित
गोंदिया,दि.29 : राज्य शासनाने 22 सप्टेबरच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र मोटर वाहन नियमात काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार खाजगी संवर्गात नोंदणी असणारी ॲटोरिक्षा नविन परवान्यावर नोंदणी करतांना अथवा सध्याच्या वैध परवान्यावर बदली वाहन म्हणून नोंदणी करतांना नियम 75 (1) मधील खंड क व या नियमाचा उपनियम 1 मध्ये नमूद केलेल्या शुल्काव्यतिरिक्त पुढील प्रमाणे अतिरिक्त परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. ॲटोरिक्षा प्रथम नोंदणी दिनांकापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधी असल्यास 1 हजार रुपये, ॲटोरिक्षा प्रथम नोंदणी दिनांकापासून एक वर्षापेक्षा अधिक आणि 2 वर्षापेक्षा कमी कालावधी असल्यास 2 हजार रुपये. ॲटोरिक्षा प्रथम नोंदणी दिनांकापासून 2 वर्षापेक्षा अधिक आणि तीन वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास 3 हजार रुपये. ॲटोरिक्षा प्रथम नोंदणी दिनांकापासून तीन वर्षापेक्षा अधिक आणि चार वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास 4 हजार रुपये आणि प्रथम नोंदणी दिनांकापासून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्यास 5 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. खाजगी संवर्गात नोंदणी झालेल्या ॲटोरिक्षा परिवहन संवर्गात नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2018 पर्यंत आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांनी दिली.
No comments:
Post a Comment