Tuesday, 24 October 2017

दवडीपार येथील एमआरईजीएसचा सिमेंटरस्ता म्हणजे भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना

25 Oct 27
गोरेगाव,दि.२४-तालुक्यातील दवडीपार येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या मागणीवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे.हा सिमेंटरस्ता गुणवत्ता नसलेला व भ्रष्टाचारासाठी उत्तम नमुना ठरला आहे.गोरेगाव पंचायत समितीच्या मग्रारोहयो विभागाचा अभियंते प्रविण खरवडे व एपीओ टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनात या रस्त्याचे बांधकाम होत असून रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात आलेला मटेरियल हा निकृष्ट दर्जाचा वापरला गेल्याने भविष्यात या रस्त्याचे आयुष्य किती असेल याबाबत शंका निर्माण झाली आहे.या रस्ताबाबत विचारणा करण्याकरिता एपीओ टेंभुर्णे यांना फोन केल्यावर त्यांनी मी वाहन चालवित असल्याचे सांगून माहिती देणे टाळले आहे.खरवडे यांच्या देखरेखीत दवडीपारसह इतर गावात झालेल्या सर्व रस्त्यांची व इतर बांधकामाची चौकशी होणे महत्वाचे झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार खरवडे हे आपल्या सहकारी मित्रासोबंत नोकरी व ठेकेदारी दोन्ही सोबत करीत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे उपजिल्हाधिकारी मग्रारोहयो यांनी प्रविण खरवडे व एपीओ टेंभुर्णे यांचीही या कामाच्या बाबतीत चौकशीची मागणी पुढे येऊ लागली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...