Tuesday, 3 October 2017

श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर आत्मघाती हल्ला; चार जवान जखमी


srinagar_650x400_81506991
श्रीनगर,दि.03(वृत्तसंस्था) –दहशतवाद्यांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) कॅम्पवर आज सकाळी 3:45 वाजता हल्‍ला केला. वृत्तसंस्थे कडुन मिळालेल्‍या माहीती नुसार सुत्रांरणनीतिकर एअरफोर्स स्टेशन आणि श्रीनगर विमानतळाजवळ हा हल्‍ला केला आहे. तिन ते चार आतंगवाद्यांनी हा हल्‍ला केल्‍याचा अंदाज वर्तवन्‍यात येत आहे. आज सकाळी जोरदार जोरदार फायरिंग आणि प्रचंड स्फोट ऐकायला आल्‍याचे अधिका-यांनी सांगितले.
असा समज झाला आहे की तीन ते चार फिदाईन किंवा आत्मघाती हल्लेखोरांनी छावणीवर हल्ला केला. जोरदार फायरिंग आणि प्रचंड स्फोट ऐकले होते. अधिका-यांनी सांगितले की,बीएसएफच्या चार जवान या हल्ल्यात जखमी झाले असून एक दहशतवादी ठार झाला असण्‍याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...