देवरी,दि. 06- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 56 ग्राम पंचायतीमध्ये उद्यापासून पंचायत समिती प्रशासनाने स्वच्छता अभियान आणि श्रमदान करण्याचा संकल्प घेतल्याचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांनी सांगितले आहे.
देवरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेली गावे स्वच्छ आणि निर्मल करण्याचा संकल्प पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या चमूने जाहीर केला आहे. या अभियानाची सुरवात उद्यापासून होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी हिरूडकर यांनी दिली. या अभियानामध्ये पंचायत समिती स्तवरावरून एक पथक दरदिवशी एका ग्राम पंचायतीला भेट देणार आहे. यावेळी हे पथक गावात स्वच्छता अभियान राबविणार आहे. याशिवाय हे पथक श्रमदान करून गावातील रस्ते असो वा पाणी अडविण्यासाठी लागणारे बंधारे असो यासारखे आवश्यक अशी कामे श्रमदानातून करणार आहेत.
No comments:
Post a Comment