साकोली,दि.31 : येथील शासकीय धान खरेदी केंद्रावरून रात्री अज्ञात चोरांनी शेतकºयांचे धान चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे शेतकºयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. चोरी गेलेल्या धानपिकाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.
श्रीराम सहकारी भातगीरणी साकोली येथे २५ ला शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकºयांनी या केंद्रावर धान विक्रीसाठी आणून ठेवले. २६ आॅक्टोबरला सदु कापगते यांनी जवळपास ४९ क्वींटल धान या केंद्रात विक्रीसाठी आणण्यात आले. मात्र उद्घाटन होऊनही धान खरेदी केंद्रा बंद असल्यामुळे धान केंद्राच्या आवारातच धान ठेवण्यात आले आहे. आज सकाळी कापगते हे केंद्रावर धान पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या धानातील जवळपास तीन क्वींटल धान चोरीला गेल्याचे दिसून आले. चोरी गेलेल्या धानाची किंमत पाच हजार रूपये सांगण्यात येते.या घटनेमुळे कापगते याचे आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्राने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कापगते यांनी केली आहे
No comments:
Post a Comment